जळगाव मिरर | ३० जुलै २०२३
पाकिस्तानात नेहमी होत असलेल्या घटनेच्या चर्चा जगभर होत असतात पण आज घडलेल्या घटनाने पाकिस्तान हादरला असल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका राजकीय पक्षाच्या बैठकीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात २० जण ठार झाले असून ५० जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांनी या बैठकीला लक्ष्य करत हा स्फोट घडवून आणला आहे. येथील पोलीस विभाग व नागरिक जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात नेत आहे.
"Death toll rises to 10 whereas more than 30 have been reported as injured in blast targeting JUI-F workers' convention in Bajaur, Pakistan," reports Pakistan's Geo News
— ANI (@ANI) July 30, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजलच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा स्फोट झाला. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोटानंतरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. जखमी आणि मृतांचा आकडाही वाढू शकतो. पाकिस्तानी न्यूज चॅनल समा टीव्हीशी बोलताना, जेयूआयएफचे ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्ला यांनी जखमींसाठी आपत्कालीन वैद्यकीय उपाययोजना सुनिश्चित करण्याचे आवाहन सरकारला केले. त्याचवेळी एका वरिष्ठ स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट कसा झाला याबाबत काहीही सांगता येणार नाही. माहिती गोळा केली जात असल्याचे अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. बचावकार्य सुरू आहे.
