
जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२३
शहरातील शिव कॉलनी परिसरातील प्रसन्न ज्येष्ठ नागरिक मंडळाची दिनांक ३० जुलै रोजी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत पुढील पंचवार्षिक कार्यकाळासाठी डॉ सुरेश राणे व सर्व पदाधिकारी संचालक मंडळ यांची बिनविरोध निवडनुक उत्साहात झाली.
त्यामध्ये डॉ सुरेश राणे अध्यक्ष , अँड प्रभाकर सुपे सचिव, श्री बी व्ही पवार उपाध्यक्ष, श्री सुरेश पाटील सहसचिव , श्री लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध फेर निवड सर्वानुमते करण्यात आली. संचालक मंडळामध्ये श्री भास्कर पाटील, श्री चंद्रकांत चौधरी , श्री शामराव सोनगीरे आणि श्री सीमाताई कासार यांची बिनविरोध फेर निवड झाली. नवीन संचालकांमध्ये श्री शशिकांत चौधरी व श्री अशोक जंगले, श्री पुंडलिक पाटील श्री जयंत झोपे श्री उध्दव पाटील श्रीमती सुशीला बऱ्हाटे यांची सर्वानुमते बिनविरोध फेर निवड झाली. आमंत्रित सदस्यांमध्ये श्री रामचरण रडे , श्री राजेश चौधरी यांची निवड करण्यात आली सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा अशोक जंगले यांनी केले.





















