
जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२३
देशभरात अनेक अल्पवयीन मुलीसह महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना नियमित घडत असतांना एक जरा वेगळे प्रकरण समोर आले आहे. चक्क एका अल्पवयीन मुलासोबत नातेवाईक महिलेने गोड बोलून जे केले ते धक्का देणारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमेठी जिह्यातील एका अल्पवयीन मुलासोबत तीन वर्षापासून नातेवाईक महिलेने मुलासोबत गोड बोलून त्याला फसवून त्याला सोबत घेवून गेली यानंतर तीन वर्षापासून त्याचा शोषण करीत शारीरिक संबध ठेवत होती. हि घटना ज्यावेळेस अल्पवयीन मुलाच्या परिवाराला समजली तेव्हा याबाबत परिवाराने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कशी बशी महिलेच्या तावडीतून अल्पवयीन मुलाची सुटका करीत त्याला परिवाराच्या हवाली केले पण गुन्हा दाखल करून कोणतीही कारवाई झालेली नाही.
महिलेच्या तावडीतून अल्पवयीन मुलगा जरी सुटला असला तरी त्याला अजूनही मुक्तता मिळाली नव्हती. कारण हि महिला मुलावर सतत त्याच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होती. तु जर असे केले नाही तर तुला खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देत होती. पुन्हा पीडित परिवार पोलिसांकडे गेले. पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. अखेर पिडीत परिवाराने न्यायालयात जात न्यायाची मागणी केली असता. कोर्टाने या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.





















