• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

तीन दिवसांपूर्वीचा खरेदी केला होता कट्टा : एमआयडीसी पोलिसांची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १० ऑगस्ट २०२३

शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या भांडणातून झालेल्या वादातून एकावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केल्याची घटना काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी स्वप्नील उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (राजपूत, 25, गजानन पार्क, रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या  संशयिताला केवळ अर्ध्याच तासात मन्यारखेडा फाट्याजवळून एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत मुद्देमाल बंदूक व काडतूससह अटक केली आहे. संशयिताला लगेच अटक करण्यात यश आल्यामुळे एमआयडीसी पोलिसांचे पोलीस अधीक्षकांसह नागरिकांनी कौतुक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील रहिवासी आकाश प्रेम तंवर (वय २४) यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार , तो गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता कंपनीत कामावर जात होता. एमआयडीसी सेक्टर नंबर व्ही येथील प्रभा पॉलिमर कंपनी जवळ जात असताना आकाश तंवर त्याचा मित्र रोहित पवार तसेच अनिल सैंदाणे, समाधान पाटील, भरत चांदवडे, धीरज पवार हे गप्पा करीत उभे असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी स्वप्निल उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (रा. गजानन पार्क, कुसुंबा) हा त्याचे मित्र विपुल पाटील व अजय पाटील (दोन्ही रा. कुसुंबा) यांच्यासोबत आला. स्वप्नील आकाश तंवर याला म्हणाला की, बब्या कुठे आहे, त्याने तुझ्या सांगण्यावरून मला मारले आहे. आज तुमच्या दोघांचा गेम करतो. त्यावर आकाश तंवर याने, बाब्याबाबत मला काही माहिती नाही, असे सांगितले.

मात्र त्याचे वाईट वाटून स्वप्नील मोरे याने कमरेला लावलेला बंदूक कट्टा काढून आकाश तंवर याच्यावर रोखला. आधी तुझे व नंतर बब्याचे काम करतो असे स्वप्निल मोरे म्हणाला. त्यावेळी त्यानी गोळी झाडली. पण आकाशने खाली वाकून गोळीचा नेम चुकवला आणि रस्त्यात पडलेला दगड उचलून संशयित स्वप्नील मोरे यांच्या दिशेने फेकला. त्यानंतर स्वप्निल मोरे याने पुन्हा दुसरी गोळी आकाश तंवर याच्यावर फायर केली. ही गोळी आकाशच्या अंगाच्या जवळून गेली. नंतर पुन्हा तिसरी गोळी झाडत असताना त्याचे पिस्तूल अडकले. त्यामुळे घाबरून आकाश याने पुन्हा दुसरा दगड उचलून त्याच्यावर फेकत असताना स्वप्नील मोरे आकाश याच्या जवळ गेला. डोक्यावर पिस्तुलाने मारले. नंतर आकाशच्या हातात दगड सापडल्याने तो पळून गेला.

ही घटना आकाश तंवरच्या मित्रांनी पाहिली. संशयित स्वप्नील मोरे यांच्यासोबत आलेले विपुल पाटील, अजय पाटील हे लगेच मोटरसायकल घेऊन त्याच्यामागे गेले आणि त्याला दुचाकीवर बसवून प्रभा पॉलिमर येथून निघून गेले. त्यानंतर आकाश तंवर याने त्याचा काका राजेश पवार यांना घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी त्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. संशयित आरोपींच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले आहेत.

सोपानने तीन दिवसांपुर्वीच 16 हजार रूपयात गावठी कट्टा आणि तीन काडतूस खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार करणारा स्वप्नील हा मन्यारखेडा येथे आहे. माहीती मिळाल्यावर लागलीच मन्यारखेडा येथे गुन्हे शोध पथकाचे पोउनी दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोना सुधीर सावळे, इमरान सैय्यद, सचीन मुंढे, योगेश बारी, किशोर पाटील, सचीन पाटील, मुदस्सर काझी, मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंढे, महिला पोना निलोफर सैय्यद अशांनी जावून त्याला मन्यारखेडा फाट्याजवळून ताब्यात घेतले.

त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले असून व त्याचे अंगझडतीमधे त्याने गुन्हयात वापरलेले २० हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा आणी एक जिवंत काडतुस काढुन दिलेले आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असुन गुन्हयाचा तपास पोउनी दिपक जगदाळे, योगेश बारी हे करीत आहेत.

Related Posts

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !
जळगाव

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !
जळगाव

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group