
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील प्रताप कॉलेज(स्वायत्त) येथे प्रथम वर्ष कला शाखा (मानव्य विद्याशाखा) अंतर्गत पूज्य साने गुरुजी सभागृह येथे प्रेरण कार्यक्रम वा प्रशिक्षण पाठयक्रम वर्ग आदरणीय प्राचार्य डॉ ए.बी.जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या वेळी डॉ.मुकेश भोळे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक धोरण अंतर्गत असणा-या विविध कोर्सेस संबंधी विस्तृत व आवश्यक माहिती दिली.
विद्या शाखे अंतर्गत व बहू विद्याशाखीय कोर्सेसची सूक्ष्म माहिती या वेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.प्रस्तुत कार्यक्रमात कला शाखेतील १२० विद्यार्थ्यांना डॉ.नलिनी पाटील,डॉ.एस.डी. बागुल,प्रा.वृषाली वाकडे,डॉ.ज्ञानेश्वर मराठे यांनी मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
या वेळी उप प्राचार्य डॉ.कल्पना पाटील,डॉ.शशिकांत सोनवणे,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.महाजन,प्रा.के.एम.गावित,डॉ.माने रमेश,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,प्रा.विजय साळुंखे,प्रा.विलास गावित,प्रा.वंदना पाटील,प्रा.सुनिल राजपूत,प्रा.बालाजी कांबळे,प्रा.सोनूसिंग पाटील आदी उपस्थित होते.प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.विजय तुंटे,डॉ.मुकेश भोळे,दिलीप शिरसाठ,कैलास पाटील,दिपक चौधरी आदींनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय तुंटे यांनी केले तर आभार डॉ.रमेश माने मानले.





















