मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. तुमचे आरोग्य खूप चांगले राहील.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.तुमच्या खर्चात वाढ होईल. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात, स्वतःची काळजी घ्या. नोकरीत तुमची बाजू चांगली राहील. सर्वजण तुमच्या कामाचं कौतुक करतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही व्यवसायात प्रगती करण्यास सक्षम नसाल. कोणताही निर्णय घेताना तुम्हाला चिंता, तणाव जाणवेल.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.वैवाहिक जीवनात दुरावा येऊ देऊ नका, त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात घरी पूर्ण वेळ द्याल आणि नोकरीही प्रामाणिकपणे कराल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात कटकटी संभवतात.आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबातील सदस्याच्या कमजोर आरोग्यामुळे तुमचं मन उदास होऊ शकतं. कामात यश मिळेल पण आरोग्याचीही काळजी घ्या.
सिंह : नवीन परिचय होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या मध्यात विनाकारण काळजी करणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. सासरच्या लोकांकडून धनलाभ होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांबरोबर काही नवीन कामावर चर्चा होईल. प्रवासाचा योग येऊ शकतो.
कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता पूर्वीपेक्षा चांगली होईल. कामात चांगली कामगिरी कराल. व्यवसायात नवीन धोरण तयार करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.
तूळ : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. शत्रुपीडा नाही. प्रवास शक्यतो टाळावेत.जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीही मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तब्येतीत अशक्तपणा राहील, परंतु कौटुंबिक जीवनात प्रेम राहील. तुमच्या व्यवसायातही चांगली प्रगती होईल.
वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.हा आठवडा तुमचा पूर्णपणे आनंददायी असणार आहे. फक्त आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचा मानसिक तणाव वाढेल आणि तब्येत थोडीशी बिघडू शकते. खर्चही वाढतील. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल
धनू : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.शारीरिकदृष्ट्या कोणताही त्रास, वेदना जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत धार्मिक यात्रा करण्याचा योग येऊ शकतो. वडिलांशी एखाद्या कारणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मकर : आध्यात्माकडे कल राहील. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.आठवड्याच्या मध्यात चांगला काळ जाईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. मुलांशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्येतीत चढ-उतार दिसतील आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि कामातही गती येईल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. ऑफिसमध्येही तुम्हाला लोकांचे सहकार्य मिळेल.
मीन : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.या आठवड्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी पैशांचा व्यवहार जपून करावा. बोलण्यावर संयम ठेवा, अन्यथा काम बिघडू शकते.