जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२३
राज्यातील एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपच्या युती सरकारमध्ये अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रवेश घेतल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेकदा शिंदे गटाचे आमदार सार्वजनिक कार्यक्रमात नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी मोठा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपकडून निवडणूक लढविण्याचे तयारी करीत असणाऱ्यांची अडचण होणार आहे. पाचोरा येथील भाजपचे अमोल शिंदेंसारख्या अनेक इच्छुकांचे काय होणार? भाजपमध्ये गेले तर शिंदे गटातील आमदारांना फायदा होणार असल्याचेही सांगून भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याचेही खडसेंनी सांगितले. ते म्हणाले, आता भाजपमध्ये गेले तरच या आमदारांची अपात्रततेची कारवाई वाचू शकते. आज तरी भाजपात जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. मात्र भाजपकडून निवडणूक लढविण्याचे तयारी करीत असणाऱ्यांची अडचण होणार आहे. पाचोरा येथील भाजपचे अमोल शिंदेंसारख्या अनेक इच्छुकांचे काय होणार? सध्या तरी असे वाटते शिंदे गटाचे सर्व आमदार भाजपमध्ये जातील हे निश्चित. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हावरून शिंदे गट व ठाकरे गटात निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असेल, असा निर्णय दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाचे याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयही प्रलंबित आहे. असे असताना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
