
जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२३
देशभरात गेल्या अनेक दिवसापासून गुन्हेगारीच्या घटना व सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशीच एक घटना केरळ येथे घडली आहे. एका उच्चशिक्षित तरुणाने महिलांच्या वॉशरूम मध्ये जाऊन फोनद्वारे चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील एका लोकप्रिय लुलु मॉल मधील महिलांच्या वॉशरूम मध्ये एक २३ वर्षीय बीटेक शिक्षण घेतलेला तरुण मॉलमध्ये बुरखा परिधान करून महिलाच्या वॉशरूम मध्ये शिरला. त्यानंतर या ठिकाणी त्याने आपला मोबाईल फोन एका छोट्या कार्डबोर्ड बॉक्स मध्ये लपविला होता. त्याला एक छिद्र देखील करण्यात आले होते. ज्यामुळे तो रेकॉर्डिंग करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचे लक्षात आलं आहे. त्यांनी याआधीही असे कृत्य केल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितले. ही घटना एका महिलेला समजली असता त्यांनी लागलीच मॉलमध्ये असलेल्या सुरक्षारक्षकांना कळविले व त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून संशयित आरोपीला अटक करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी या तरुणाला सुनावण्यात आली आहे हा तरुण एका आयटी कंपनीत कार्यरत असल्याचेही समजते.




















