अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील जनतेला एक मोठी सुवर्णसंधी आज प्राप्त होत आहे. भारताचे चांद्रयान ३ आज चंद्रावर उतरत असल्याने हा ऐतिहासिक सुवर्णक्षणाचा अनुभव जनतेला घेता यावा यासाठी अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थानने पुढाकार घेतला असून आता याचे थेट प्रक्षेपण जनतेला पाहता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे चांद्रयान ३ आज चंद्रावर उतरत असल्याने हा ऐतिहासिक सुवर्णक्षणाचा अनुभव अमळनेरकर जनतेला पाहता यावे यासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थानने पुढाकार घेवून शहरातील सुभाष चौकात दुपारी ४ वाजेपासून भव्य स्क्रीनवर चांद्रयान चंद्रावर उतरण्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तरी या कार्यक्रमास शहरातील जनतेला लाभ घेवून प्रचंड जल्लोष करण्याची संधी गमवू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांसाठी खुर्च्यांची सोय केली आहे.




















