
जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यातील रस्त्यावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असून आज पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील काही तरुण चारचाकी व दुचाकी वाहनाने जात असतांना भीषण अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पाचोरा तालुक्यातील पुंनगाव येथील तिघेजण शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जात असतांना जामनेर शहराजवळील भवानी घाटात बोदवडकडून ४ चाकी वाहन जामनेरकडे येत होती तर जामनेरकडून बोदवडच्या दिशेने दुचाकीवर तरुण जात असतांना दोघा वाहनांनी समोरासमोर धडक झाली. या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. तर अर्जुन जाधव सुरवाडे व तुषार संतोष जामदार रा. पुंगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन नाल्यात जावून पडल्याने कारमधील गीतांजली सुहास बांगर, वंदना माधव दांभोरे, प्राजक्ता विठ्ठल आसुदे रा. छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. हे तरून शिरसाळा मारूती दर्शनासाठी जात असल्याचे समजते. तर या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.





















