जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२३
राज्यातील बीड शहरात दि.२७ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांची जोरदार फटके बाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचं देखील भाषण प्रभावी ठरलं.
दरम्यान या भाषणावेळी धनंजय मुंडे यांनी केलंल्या वक्तव्यमुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. मी कृषी विभागाचा मंत्री असलो तरी अनेक अडचणी आहेत असे धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात बोलले. यामुळे धनंजय मुंडे धनंजय मुंडे मंत्रिपदावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. “आजची सभा ही १७ तारखेला बीडमध्ये. झालेल्या सभेच्या उत्तराची नाही तर बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या उत्तरदायित्वाची सभा आहे. बीड जिल्ह्याने आदरणीय शरद साहेबांवर फार प्रेम केलं, मात्र त्याबद्दल साहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न आहे. पण साहेबांचे उत्तरदायित्व विकासाच्या माध्यमातून आजपर्यंत बीड जिल्ह्याला अजितदादांनी दिले आहे”असे धनंजय मुंडे म्हणाले.