
जळगाव मिरर । २९ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात एक जुनी इमारत मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कोसळली असून या इमारती खाली एक महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज नगरात असलेली एक जुनी इमारत ९ वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी धाव घेतली आहे. इमारत जीर्ण झालेली असल्याने त्यात फारसे कुटुंब रहिवास करीत नसल्याने मोठी हानी टळली आहे.





















