
जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२३
देशभर २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. जळगाव शहरातील रोझलॅन्ड इंग्लिश मिडियम शाळेत देखील मंगळवार राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.
भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस ध्यानचंद यांचा वाढदिवस २९ ऑगस्ट हा दिवस म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. इयत्ता आठवी,नववी च्या विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद सिंग यांच्या माहितीपर भाषण दिले . त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षकांनी शैक्षणिक जीवनात खेळाविषयी महत्त्व सांगितले.
भारताची क्रीडा संस्कृती वाढावी त्याला प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले . या दिवसाचे औचित्य साधून हॉकी चे प्रशिक्षण देण्यात आले.





















