
जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र शासन कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मार्फत बांधकाम मजुरांना ओळखपत्र देण्यात येत आहेत. हे ओळखपत्र देतांना कुठलीही तपासणी न करता आर्थिक गैरव्यवहार करून ओळखपत्र दिले जात आहेत अश्या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष नितीन जाधव यांच्या तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की बांधकाम कामगार नसलेल्या मंडळी दलाला मार्फत हे ओळखपत्र काढून घेत आहे व जे खरोखरी बांधकाम कामगार आहेत असे लोक या सुविधेपासून वंचित राहत आहेत. म्हणून आज पर्यंत जेवढे अर्ज आले असतील त्याची सखोल चौकशी करून गरीब बांधकाम मजुरांना न्याय द्यावा असे ही निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे. यात तथ्य आढळल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिला. सदर प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष नितीन जाधव सह ज्ञानेश्वर पाटील, देवेश बालपण, मिलिंद पाटील, खुशाल मराठे, शिवम पाटील, कल्पेश पाटील, भरतसिंह पाटील, विक्रम सोनवणे, अंशुमन जाधव, ओम शिंदे, कार्तिक बडे, घनश्याम पाटील, रोहन सोनवणे आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.





















