चाळीसगाव : कल्पेश महाले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अवमान केल्याप्रकरणी लालबाग चा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल कण्यासाची मागणी सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्याकडे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा चाळीसगावच्या वतीने दि १८ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राजाच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न लालबागच्या राजा मंडळाने केला, त्यांचा या पाठीमागचा नेमका हेतू काय होता? हे आम्हा शिव अनुयायीस कळत नाही. परंतु त्यांनी शिवराजमुद्रा लालबाग च्या राजाच्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत . लालबागचा राजा (गणपती बाप्पा) देव जरी असले तरी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे देव देव्हाऱ्यात आहेत. आणि ही राजमुद्रा पायावर असणे ही बाब निषेधार्थ आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा मस्तकी लावली पाहिजे होती पण पायावर पहायला मिळत आहे याबाबत चे दु :ख यातना शिव अनुयाना वाटत आहे. संबधित प्रकरणाचा पोलीस प्रशासनाच्या वतीने चौकशी करून लालबाग चा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंहजी देशमुख यांच्या कडे चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे करीत आहोत.
या मागणीचे दखल न घेतल्यास चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत्या ८ दिवसात चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,निवेदनावर गणेश पवार ,अरुण पाटील प्रमोदबापु पाटील,श्याम देशमुख ,विजय ( पप्पू ) पाटील,प्रदीप देवराम देशमुख ,गोरख साळुंखे, खुशाल पाटील,नाना शिंदे ,तमाल देशमुख,संजय कापसे,विलास मराठे, राजेंद्र पाटील,गोविंदा चव्हाण,मुकुंद पवार,भरत नवले ,छोटु अहिरे,योगेश पाटील,प्रदीप मराठे,उदय भोसले,भूषण खालकर,प्रयास देशमुख,रवींद्र मोरे,श्रीकांत तांबे, शिवाजी गवळी,स्वप्नील गायकवाड,भूषण चव्हाण,दिपक देशमुख,संदीप पवार,पवन पवार ,भुपेश पाटील,किरण देशमुख ,विठ्ठल पवार आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.