जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२३
गेल्या काही वर्षाआधी प्रेम करण खूप कठीण मानले जात होते पण अलीकडचे प्रेम केवळ काही वेळेपुरता असते. असे नेहमीच जाणवत असते तर काही प्रेम आंधळे देखील असते. नुकतेच राजस्थानमधील अंजू नामक तरुणी हे प्रेमासाठी भारत सोडून पाकिस्तानात गेली होती. तेथे जाऊन तिने आपला धर्म बदलला आणि इतकंच नाही, तर तिने पाकिस्तानी तरुणासोबत विवाह देखील केला.
लग्नानंतर तिने आपलं नाव फातिमा ठेवलं. पण आता याच फातिमाला पुन्हा भारतात यायचं आहे. फातिमाचा नवरा नसरुल्लाहने याबाबतची माहिती दिली आहे. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून तिला आपल्या मुलांची खूपच आठवण येत आहे. तिच्या आरोग्याचा विचार केला तर तिने परत भारतात जाणेच योग्य राहिलं, असं नसरुल्लाहने म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे फातिमाला जरी भारतात यायचं असलं तरी, तिला पती आणि मुलं स्वीकारणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे. घर आणि लहान मुलांना सोडून गेल्यानंतर फातिमाच्या (अंजू) पतीने तिच्यासोबत सर्व संबंध तोडले असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे तिच्यासमोर मोठं कोडं निर्माण झालं आहे.
20 जुलै रोजी राजस्थानमधील अंजू नामक विवाहित महिला जयपूरला जाते, असं सांगून घरातून निघून गेली होती. पण तिने जयपूरला न जाता थेट पाकिस्तानची वाट धरली होती. पाकिस्तानला गेल्यानंतरही ती आपल्या पतीसोबत व्हॉट्सअॅपवर बोलत राहिली आणि नंतर तिने खरं काय ते सांगून टाकलं. अंजू पाकिस्तानात तिच्या प्रियकराला भेटायला गेली. दोघांचीही फेसबुकवरून ओळख झाली होती. पुन्हा भारतात परतणार असल्याचा दावा तिने केला होता. मात्र, त्यानंतर अंजूने प्रियकरासोबत लग्न करत आपला धर्म बदलला. तसेच फातिमा असं नाव देखील ठेवलं. नसरुल्लाहसोबत काही दिवसांचा सुखी संसार केल्यानंतर आता अंजूला भारतात परत यायचं आहे.