जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२३
देशासह अनेक राज्यात आज लाडक्या गणपती बाप्पाचं गणेश चतुर्थीला मोठ्या आनंदात आणि जल्लोषात आगमन होत आहे. मुंबई, पुण्यात तर गणेशोत्सव मोठ्या सणांपैकी एक मानला जातो. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई अशा प्रसिद्ध गणपतींचीदेखील आज प्राणप्रतिष्ठा झाली आहे. गणेशोत्सवानिमित्ती सोशल मीडियावरही गणपतींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Bappa is here 💕#GaneshChaturthi pic.twitter.com/gkZj7a9r7l
— Vertigo_Warrior (@VertigoWarrior) September 18, 2023
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणपती बाप्पाचं हत्तीने दर्शन घेतल्याची हा व्हिडीओ आहे. बाप्पांच्या गळ्यात हार घालून या हत्तीनं बाप्पाला मानवंदना दिली. आजूबाजूला उपस्थित भक्तही हे दृष्य पाहून गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देताना दिसत आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. Vertigo_Warrior या X अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १२ हजार लोकांना लाईक केलं आहे. तर जवळपास १५०० लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.