बातमीदार | २१ सप्टेंबर २०२३
देशभरात गेल्या काही वर्षापासून पेट्रोल व डीझेलचे नियमित भाव वाढ होत आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमती काही टक्क्यांनी घसरल्या आहेत. WTI क्रूडमध्ये १.०१ टक्क्याची घसरण झाली आहे. त्यामुळे क्रूड ९०.२८ प्रति बॅरल डॉलरने विकलं जात आहे. ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये ०.४९ टक्क्यांची घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड आज ९३.०७ प्रति बॅरल डॉलरने विकलं जात आहे. आज काही शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत देखील बदल झाला आहे.
दररोज सरकारी तेल कंपन्या सकाळी ६ वाजता कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर करतात. कच्च्या तेलाच्या किंमतींवर पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई या प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत.
मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
पुणे – पेट्रोल १०५.९६ रुपये आणि डिझेल ९२.३७ रुपये प्रति लिटर
औरंगाबाद – पेट्रोल १०६.४२ रुपये आणि डिझेल ९२.९३ रुपये प्रति लिटर
ठाणे – पेट्रोल १०६.४९ रुपये आणि डिझेल ९४.४५ रुपये प्रति लिटर
नाशिक – पेट्रोल १०६.८३ रुपये आणि डिझेल ९३.३३ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर – पेट्रोल १०६.४४ रुपये आणि डिझेल ९२.९८ रुपये प्रति लिटर
नागपुर – पेट्रोल १०६.०४ रुपये आणि डिझेल ९२.५९ रुपये प्रति लिटर