जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२३
बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण झाली होती. या स्थितीची तीव्रता आता कमी होत असून ती आता चक्रीय स्थितीत आहे. तसेच ती झारखंड आणि लगतच्या भागात आहे. त्यामुळे महराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी दिला आहे.
राज्यातील घाटमाथा परिसरात गुरुवारपासून जोरदार पुनरागमन केले आहे. कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी वाऱ्यांची वाढलेली तीव्रता यामुळे राज्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात ऑरेंज तर तुरळक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ताम्हिणी ५६ मिमी, खोपोली ४२ मिमी, डुंगरवाडी ४० मिमी, लोणावळा ३७ मिमी, शिरगाव ३५ मिमी, कोयना ३२ मिमी, दावडी २८ मिमी, अंबवणे २३ मिमी, वळवण २१ मिमी, भिवपुरी १८ मिमी, वाणगाव १८ मिमी, भिरा १४ मिमी, ठाकूरवाडी १२ मिमी, शिरोटा ८ मिमी आणि खंड ४ मिमी.