जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२३
देशात मोठ्या संख्येने प्रत्येक व्यक्ती डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. अनेकाना जे येत नाही ते शिकून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर प्रत्येक ठिकाणी कॅशलेस ट्रांजेक्शन होतात. दुकानात किंवा अगदी भाजी विक्रेते देखील आपल्याकडे क्यूआर कोड ठेवतात. मात्र सोशल मीडियावर एक कहर व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका क्यूआर कोडच्या मदतीने भीक मागण्यात आली आहे.
सोशल मीडियावर एका मुलीचा भीक मागतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये एक लहान मुलगी रस्त्यावर भीक मागत आहे. भीक मागत असताना अनेक जण आमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत सांगतात. सुट्टे पैसे नाहीत म्हणून भीक देत नाहीत. त्यामुळे या मुलीने असं करणाऱ्या लोकांकडून पैसे मिळवण्यासाठी थेट क्यूआरकोड आणला आहे.
क्यूआर कोड स्कॅन करा आणि भीक द्या असं ही मुलगी म्हणत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी क्यूआर कोड हातात घेऊन आली आहे. काही मुलं तिथे उभी आहेत. त्यांच्याकडे ती खाण्यासाठी मागते. मात्र ते तिच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही मुलगी त्यांना क्यूआर कोड दाखवते.
मुलीच्या हातातला क्यूआर कोड पाहून ही मुलं चकित होतात. @sutta_gram नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/CwIO_HfMfjL/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
या व्हिडीओमध्ये पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ देखील एडिट करण्यात आला आहे. यामध्ये मोदी त्यांची डिजिटल इंडियाची संकल्पना सांगत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक हास्यास्पद कमेंट केल्यात. काही व्यक्ती लहान मुलांना अशी कामे करण्यास भाग पाडतात असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे. या आधी देखील एका व्यक्तीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हात पाय सुदृढ असूनही काही व्यक्ती भीक मागतता. त्यात हा व्यक्ती क्यूआर कोड स्कॅन करून भीक मागत होता. या व्यक्तीचा व्हिडीओ देखील भरपूर व्हायरल झाला होता.