
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्हा शिवसेना तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शहरातील मंगलम हॉल येथे उत्साहात संपन्न झाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिवसेना प्रमुख निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल एस तायडे, क्रीडाशिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधरी, उपजिल्हाप्रमुख स्वप्निल परदेशी व प्रतीक भोळे, जळगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील,तालुका समनवयक जितेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन जिल्हा शिवसेना प्रमुख निलेश पाटील व उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी व मान्यवर यांनी केले अध्यापना सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविधांगी उपक्रम राबवून उत्कृष्ठ कार्य करणारे जिल्ह्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यात डॉ पी आर चौधरी, डॉ विजय पाटील, डॉ महेश पाटील, डॉ कांचन विसपुते, प्राचार्य अतुल मालखेडे, प्रा आशिषकुमार चौधरी, प्रा राजेंद्र सांगळे, प्रा ईकबाल मिर्झा, मुख्याध्यापक एल एस तायडे, मुख्याध्यापक कांचन नारखेडे, मुख्याध्यापक धनलाल भोई, मुख्याध्यापक सुनिल चव्हाण, मुख्याध्यापक मंगेश भोईटे, मुख्याध्यापक सुरेश पाटील, मुख्याध्यापक प्रकाश चौधरी, अजय देशमुख, किशोर पाटील, समिधा सोवनी, जयश्री माळी, सरस्वती ढाके, विद्या चौधरी, करुणा महाले, उमेश्वर सुर्यवंशी, अजय काशीद, सुरेश महाजन, ईश्वर महाजन, नरेंद्र महाजन, राजेंद्र आल्हाट, सुनील दाभाडे, प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, मयुर पाटील, युवराज माळी, संदीप पवार, स्वाती पांढरे, स्वाती चौधरी, अनिल वाघ,सुनील ताडे, राकेश विसपुते यांचेसह एकूण पंचावन्न शिक्षकांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन युवासेना सचिव सागर हिवराळे यांनी केले यशस्वीतेसाठी योगेश सोनवणे, सचिन महाजन शिवसेना पदाधिकारी सचिन सोनार,गिरीश सपकाळे, हितेश ठाकरे, यश सोनवणे यांनी परिश्रम घेतले.





















