जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२३
जळगावातील सागर कुटुंबळे व रोहित कुटुंबळे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करित असताना गणपती उत्सवाचे मुळ ब्रीद लक्षात घेऊन स्वातंत्र्य संग्रामातील त्रिखंडात गाजलेली मोरिया जहाजेतील फ्रान्सलगत मारलेली ऐतिहासिक उडी हा देखावा सादर करून इतिहासातील एक सोनेरी पान उलगडले, त्यातुन सावरकरांच्या या साहसी उडीने इंग्लंडची जगभर झालेली नाचक्की त्यामुळे सगळ्या देशामधील वृत्तपत्रांनी इंग्लंडवर घेतलेल्या तोंडसुखाचे दुर्मिळ कात्रणे गणपती जवळ लावली आहेत व इंग्लंडवर फ्रान्स देशाने आतंरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल करून ब्रिटिशांना समस्त देशासमोर मान खाली घालवायला लावली त्यामुळे ब्रिटिश सरकारने सावरकरांना आणखीच कठोरातील कठोर शिक्षा करण्याचा निर्णय घेतला, या सगळ्या प्रसंगांची चलध्वनी चित्रफित देखील याप्रसंगी करण्यात आली आहे. या सगळ्या चित्रांमध्ये लक्षपुर्वक अधोरेखित केलेले भारतरत्न पदाची प्रतिकृती व त्यामध्ये “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” हे नाव प्रत्यक्षपणे लिहलेले दिसून येत आहे. अप्रत्यक्षपणे कुटुंबळे परिवार सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी मागणी करताना दिसुन येत आहे. परिसरातील लहानमुलांसह आपेष्टजनाना यानिमित्ताने रोज संध्याकाळी हा व्हिडिओ दाखवण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन व हर घर सावरकर समिती आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हा व्हिडिओ पाठवण्यात आला आहे.