जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२३
राज्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यत अनेक जिल्ह्यात धुमधडाक्यात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना गुहागरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये ब्रेक फेल टेम्पो गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर गावात रस्ते अपघातातची दुर्देवी घटना घडली आहे. या गावात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ब्रेक फेल टेम्पो गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसला. ब्रेक फेल टेम्पोमुळे गणेशभक्त जखमी झाले. तर मिरवणुकीतील या गणेशभक्तांपैकी दोघांचा मृत्यू झाला.
दीपक भुवड (४८) आणि कोमल भुवड (१७) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. या घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. या जखमींमधील तिघांना उपचारांनंतर घरी सोडले आहे. तर दोन जखमींना उपचारासाठी रत्नागिरीमधील सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात सध्या ९ जण जखमी आहेत. तर ४ जण गंभीर जखमी आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.