जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३ |
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावानजीकच्या रेल्वेरूळाजवळ गावातील २८ वर्षीय तरुणाने कुठल्या तरी नैराश्यात येऊन रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र कृष्णा पाटील ( वय २८) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली गावात कृष्णा पाटील हा आईसोबत वास्तव्याला होता. त्याच्या वडिलांचे कोरोना महामारीमध्ये निधन झाले आहे. जगतराव पाटील यांचे शेतामध्ये शेतमजूर म्हणून महेंद्र काम करीत होता. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तो कामावर जात नव्हता. कुठल्यातरी नैराश्यात आल्यामुळे त्याने शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिरसोली गावाजवळच्या रेल्वे रुळावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान घटनेची वार्ता कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी महेंद्र पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान महेंद्र पाटील यांच्या मृत्यूची माहिती कळताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. महेंद्र पाटील याच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे