जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२३
जळगाव जिल्हा पोलीस गेल्या अनेक दिवसापासून सराईत गुन्हेगार तसेच गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना अद्दल घडवीत आहे. यातील एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दोन गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी २ वर्षांकरिता जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (वय-21, रा. एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी) आणि (दीक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय-१९, रा, यादव देवचंद हायस्कूल जवळ मेहरून) असे हद्दपार केलेल्या दोन्ही गुन्हेगारांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी दहशत पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण वातावरण तयार करण्याचे काम हे दोन्ही गुन्हेगार करत होते. त्यांच्यावर एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल आहे. त्यांच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आले होते. तरी देखील त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.
या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे, जमीन शेख आणि इम्तियाज खान यांनी गुन्हेगार आशुतोष सुरेश मोरे आणि दीक्षांत देविदास सपकाळे या दोघांविरोधात हद्दपार करण्याचे अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अहवालाचे अवलोकन करून दोघांना २ वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश मंजूर केले. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर हद्दपारचे कारवाई केली आहे, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील दामोदरे यांनी मोलाचे सहकार्य केले.