चाळीसगाव : कल्पेश महाले
तालुक्यातील गणेशपुर येथील शेतकऱ्याचा बादल नामक बैलाला(गोऱ्हा) विक्रमी बोली लागली आहे. मुंबईच्या व्यापाऱ्यांनी हा गोऱ्हा तब्बल ३ लाख ११ हजार रुपयात विकत घेतला. चाळीसगाव परिसरात बैलाला एवढी विक्रमी किंमत मिळाल्याची पहिलीच घटना असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील निवृत्त उत्तम पाटील या शेतकऱ्याकडे बादल नावाचा ७ महिन्याचा गोऱ्हा आहे. अत्यंत देखणा व चपळ असलेल्या बादल गोऱ्हाने जळगाव धुळे बारामती अशा अनेक ठिकाणी झालेल्या बैलगाडा शर्यतीन मध्ये अनेक बक्षीस पटकवली आहेत. बादलने स्पर्धेत रोख रकमेसह, टिव्ही, फ्रिज, अशी महागडी बक्षिसे पटकावली आहेत. मुंबईच्या व्यापाऱ्याने खरेदी केलेल्या बादल गोऱ्हाची जळगाव जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात ख्याती होती. बादलची ख्याती ऐकून मुंबईचे संतोषशेठ तोंडकर यांनी सोमवारी थेट गणेशपुर गाठले आणि बादल गोऱ्हाला मागणी घातली. हा बादल गोऱ्हा संतोषशेठ तोंडकर यांनी तब्बल ३लाख ११हजार रुपयांनी खरेदी करून मुंबईला नेला. यावेळी विकास पाटील, पप्पु पाटील, गणेश पुरकर, मंगेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.