जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२३
राज्यात गेल्या १५ दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अखेर पकडले होते. त्यानंतर आता ड्रग्ज तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन महिलांना अटक केल्याची माहिती आहे. या दोन महिला ललित पाटीलच्या मैत्रिणी असल्याची माहिती आहे. ललित पाटील ससून रूग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी त्यांच्या संपर्कात होत्या. या दोन्ही महिलांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे.
ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी काल अटक केल्यानंतर पुणे पोलिस देखील कसून तपास करत आहेत. त्यांनी काल नाशिकमधून दोन्ही महिलांना अटक केली आहे. ललित पाटील पळून गेल्यानंतर तो नाशिकला गेला होता. तो नाशिकला गेला तेव्हा त्याला या महिलांनी पैसै दिले सोबतच त्याची राहण्याची आणि पळून जाण्यासाठी देखील त्यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे. जमा झालेले पैसे, सोनं हे या दोन महिलांकडे होते अशी माहिती पोलिसांकडे आहे.
आज या महिलांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. फरार असल्याच्या काळात तो सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता.ड्रग्सच्या काळया कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी नाशिक शहरातून दोघींनी अटक केली.