जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२३
कोर्टामध्ये वर्षानुवर्ष विवाहितांना घटस्फोट घेण्याचे प्रकरण चालत असतांना एक परिवारातील खळबळजनक घटना समोर आली आहे. हि घटना बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील आहे. तर या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालेला आहे.
सर्वात लहान दिरासोबत लग्न करण्यासाठी एक नव्हे तर दोन वहिनीमध्ये राडा झाला आहे. या दोन महिलाच नाही तर त्यांची माहेरची मंडळीदेखील एकमेकांना भिडल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा तमाशा पाहण्यासाठी शे-दोनशे गाववालेदेखील जमा झाले होते. या लोकांसमोरच या दोन गटांमध्ये जोरदार लाथाबुक्क्या झाल्या. काही लोकांनी त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी आले आणि एका महिलेला तिचा पती आणि मुलांसोबत पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
बिहार जिल्ह्यातील नालंदा येथील मलामा गावातील महेंद्र पासवान यांना तीन मुलगे आहेत. सुबोध कुमार, मॅनेजर पासवान आणि हिरेंद्र. यापैकी मॅनेजर पासवानचा मृत्यू झाला आहे. तर मोठा मुलगा सुबोध कुमार जिवंत आहे. धाकटा मुलगा हिरेंद्र याचे अद्याप लग्न झालेले नाहीय. मॅनेजरच्या विधवा पत्नीला हिरेंद्रसोबत लग्न करायचे होते. तिला तीन मुलेही आहेत. माहेरच्या लोकांनी हिरेंद्रसोबत लग्न ठरवून ते करण्यासाठी हिलसाचे सरकारी कार्यालय गाठले होते.
बिहार के नालंदा में एक देवर से शादी करने के लिए दो भाभियां आपस में भिड़ गईं, हाई वोल्टेज ड्रामे के बीच जमकर चले लात-घूंसे।#Bihar #BiharCrime #bihar_police #Nalanda #Hilsa pic.twitter.com/URh5QGJLNO
— Yogesh Sahu (@ysaha951) October 20, 2023
परंतू, हिरेंद्रवर त्याची मोठी वहिनी देखील फिदा होती. तिला देखील हिरेंद्रसोबत लग्न करायचे होते. यावरून दोन्ही वहिन्या एकमेकींना भिडल्या, यात कमी की काय म्हणून दोघींचेही माहेरचे लोक देखील एकमेकांना मारहाण करू लागले. यानंतर पोलिसांनी सुबोध कुमार व त्याच्या पत्नीला पोलीस ठाण्यात नेले तेव्हाकुठे हिरेंद्र आणि त्याची विधवा वहिनी हेमंतीदेवी यांचे लग्न लागले. या साऱ्या लव्ह ट्रँगलमध्ये गावकऱ्यांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.