चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात एका महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मेहूणबारे परिसरात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील भऊर गावात बापू पाटील हे आपल्या पत्नी व दोन मुले, आई वडिलांसह वास्तव्यास असून त्यांच्याजवळ दीड एकर शेती असून त्यावरच घराचा प्रपंच सुरु होता. शेतीला जोडधंदा व्हावा म्हणून महीलेच्या पतीने एका फायनान्स कंपनीकडून साडे चार लाखांचे कर्ज काढून मालवाहू वाहन घेतले होते. त्यामध्ये बचत गटाच देखील चार लाखांचे कर्ज होत. हे कर्ज कसं फेडणार याची महिलेला सतत चिंता लागलेली होती. मी सर्व कर्ज फेडून टाकेल तू चिंता करु नको, असा धीर नेहमी पती तिला देत होता.
दरम्यान रविवारी सायंकाळपर्यंत पती शेतात होते. तर मुले गावातच देवीच्या आरतीला गेले होते. तर महिलेचे सासरे लहान दिराकडे तर सासू गावी गेलेली होती. पती घरी आले असता कर्जाचे खुप टेन्शन होत असल्याचे महिलेने पतीला सांगितले. पतीने पत्नीची समजूत काढत देवीच्या आरतीला गावात निघून गेला. काही वेळाने दोन्ही मुले व पती घरी आले असता शितल पाटील यांनी घरात दोरीच्या सहाय्याने आपली जीवनयात्रा संपविल्याचे दिसून आले. आपल्या आईची अशी अवस्था पाहून दोन्हीं मुलांनी एकच हंबरडा फोडला होता. त्यावेळी त्यांच्या घरी सर्व गावकऱ्यांची गर्दी झाली होती. त्यावेळी महिलेल्या खाली उतरवून दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केल. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशन ला विवाहितेच्या पतीने दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.