जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२३
राज्यातील सर्वाधिक वेगवान समजला जाणारा समृद्धी महामार्गावर अनेक अपघाताच्या माद्यमातून हा महामार्ग चर्चेत आला आहे. दि.२८ रोजी शनिवारी सकाळी देखील अघाताची मोठी घटना घडलीये. टायर फुटल्याने अपघात होऊन संपूर्ण ट्रकने जागीच पेट घेतला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाशिम जिल्ह्यातील लोकेशन 163 येथे सकाळी ही घटना घडली आहे. अपघातात ट्रकचा टायर फुटून डिव्हाडरला ट्रक घासत गेला. त्यामुळे ट्रकने पेट घेतला या आगीत ट्रक जळून खाक झालाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक पुण्याहून चंद्रपूरला जात होता. समृद्धी महामार्ग लोकेशन 163 जवळ ट्रकचा समोरचा टायर फुटला. त्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक डिव्हायडरला आदळत त्याचे घर्षण झाले, त्यामुळे ट्रकला आग लागली. ट्रकचे घर्षण झाल्यामुळे लवकरच डिझेल टँकने पेट घेतला. यामध्ये ट्रक पूर्णपणे जळाला. ट्रकने पेट घेताच वाहन चालकाने ट्रकमधून खाली उडी घेतली आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समृद्धी महामार्ग लोकेशन 108 पायलट विविधता चव्हाण यांना या घटनेची माहिती तात्काळ देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तेथे पोहचेपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता.