जळगाव मिरर | २२ नोव्हेबर २०२३
ग्रामीण भागातील अनेक अल्पवयीन मुलीना विविध आमिष देवून अनेक अत्याचाराच्या घटना सातत्याने उघडकीस येत असतांना अशीच एक धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील घडली आहे. एका १९ वर्षीय तरुणीला ५० वर्षीय इसमाने लॉजवर नेत तिचा व्हिडीओ बनवत सातत्याने अत्याचार केल्याची घटन घडली आहे. याप्रकरणी एका विरोधात चाळीसगाव मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय पीडीता शेतात गेल्यानंतर आरोपीने तिला शेतातील घरात नेत बोलायचे आहे, असे सांगून ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडीतेशी वारंवार मोबाईल संपर्क साधून भेटण्यासाठी आग्रह धरला शिवाय पीडीता चाळीसगावातील महाविद्यालयात आल्यानंतर तिथेदेखील संशयित आला व त्याने एका लॉजवर पीडीतेला नेत पुन्हा अत्याचार केला व अश्लील फोटो तसेच व्हिडिओ काढले. जानेवारी 2022 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान हा प्रकार सुरू राहिला. यानंतर पीडीतेचे दुसरे लग्न जमले मात्र आरोपीने मध्यस्थीला फोन करीत पीडीतेसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगून अश्लील फोटो व व्हिडिओ असल्याचे सांगून लग्न मोडले. तपास सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी करीत आहेत.