जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२३ | अनेक छोट्या मोठ्या शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरु असून अशाच एका ठिकाणी बांधकाम सुरु असतांना ९ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडुन त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना घरातील सदस्यांना माहित मिळताच हृदय हेलावून टाकणारा आक्रोश सुरु होता. हि घटना पुणे शहरातील बाणेर गणराज चौकाजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील बाणेर येथे गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू असतांना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या बिल्डिंगच्या पहाडाचे काम सुरू होते. या बिल्डिंगवरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. त्या दरम्यान शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्र केतन राऊत ह्या नऊ वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यात लोखंडी सळई पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.