अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यामध्ये सुरु असलेले वाक्ययुद्ध आता कार्यकर्त्यांनी हाती घेत मैदानावर उतरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपल्या नेत्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी दोन्ही नेत्याच्या पोस्टरहाती घेवून रस्त्यावर येत निषेध व्यक्त करीत आहे. नुकतेच अमळनेर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी देखील आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने खडसे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
यावेळी भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, मा.जि.प.सदस्य व्हि.आर पाटील, दिलीप ठाकुर गोकुळसिंग परदेशी,दिलीप साळी रावसाहेब पाटील योगिराज चव्हाण, समाधान पाटील कल्पेश पाटील कृणाल गिरासे, प्रवीण पाटील, सौरभ पाटील, निनाद जोशी गौरव, विसपुते सागर शेटे, दीपेश महाजन व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.