जळगाव मिरर | २६ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सातत्याने घडत असतांना नाशिक शहरातून कॅटेनर आणि कारचा भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हा अपघात मनमाड-मालेगाव राज्यमहामार्गावर चौंढी घाटात झला असून कारमधील एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२६ नोव्हेबर रविवारी मनमाड- मालेगाव राज्य महामार्गावरील चौंढी घाटात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. कारमधील चारही तरुण हे शिर्डीकडे जात होते. कंटेनर पलटी होऊन कारवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झालेत.
या अपघाताची माहिती मिळताच चौंढी गावातील नागरिकांसह पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यासाठी केली मदत केली. अपघातातील तिघा जखमींना मालेगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर कंटेनर महामार्गावर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला काढून वाहतुक सुरळीत केली.