जळगाव मिरर | ३० नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक शहरातून धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना अशीच घटना पुणे शहरातून समोर आली आहे. कोंढवा भागात राहणाऱ्या एका रिक्षाचालक तरुणाने पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तोहिद शेख असे या तरुणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी स्वतःचा व्हिडिओ बनवत त्याने पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात राहणारा तोहिद शेख हा शेख हा अरबाज वली मोहम्मद मेमन यांच्याकडे ड्रायव्हर व सुपरवायझर म्हणुन 4 वर्षांपासून नोकरीस होता. त्यांच्यामध्ये काल कामावर न आल्यावरुन वाद झाला होता. यावरुन अरबाज वली याने तोहिद शेखला त्याच्या सासऱ्यासमोर शिवीगाळ केली.
हा अपमान सहन न झाल्याने तोहिदने कोसर बाग येथील काम चालु असलेल्या पाचव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तरुणाने स्वतःचा व्हिडिओ शूट केला असून त्यामध्ये त्याने यामागचे कारण सांगितले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तोहिद शेखच्या पश्चात दीड दोन वर्षाचा मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार असून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी केली . या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी घेतली असून अधिक तपास सुरु आहे.