जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यात उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला तु मला पैसे दे नाहीतर तुझे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करेल अशीच धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेसह तीन जणाविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन तरुण मार्च २०२० ते २०२३ दरम्यान तालुक्यातील एका गावात रहिवासास होता. याठिकाणी एका महिलेने या अल्पवयीन तरुणासोबत २०२० मध्ये बळजबरीने चुकीचे कृत्य करायला लावले व त्याबाबत व्हिडीओ काढून अल्पवयीन मुलास तु मला पैसे दे नाहीतर तुझा व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी देवून अल्पवयीन मुलाकडून वेळोवेळी पैसे घेवून व पैश्याची देखील मागणी केली. या घटनेची माहिती अल्पवयीन मुलाच्या वडिलांना समजल्यावर त्यांनी एका तरुणाशी विचापूस केली असतात त्यांना देखील शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आल्याने अल्पवयीन मुलाने पाचोरा पोलिसात धाव घेत तीन तरूणासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.