जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु होती यात प्रामुख्याने कॉंग्रेस व भाजप यांच्या जोरदार लढत दिसून आली तर आज विधानसभा निवडणुकीचे निकाल दुपार पर्यत हाती लागणार आहे. यात मध्यप्रदेशमध्ये भाजप तर राजस्थानमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेस आघाडीवर दिसून येत आहे.
सध्या आलेल्या कलांनुसार भाजपने राजस्थानध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजप १०१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ८३ जागांवर आघाडीवर आहे. राजस्थान विधानसभा निवडणूकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीला भाजप आडीवर दिसले आता काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. १४२ जागांपैकी भाजप ७६ जागांवर पुढे आहे. तक काँग्रेस ६१ जागांवर पुढे आहे.