जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु असतांना आज दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी भरदुपारच्या सुमारास जळगाव – धरणगाव रस्त्यावर पिंप्री गावानजीक मालवाहतूक गाडी व दुचाकीचा भीषण अपघातात दुचाकीस्वार ६५ वर्षीय वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव – धरणगाव रस्त्यावर पिंप्री गावानजीक सतखेडा गावातील रहिवासी मधुकर बाबुराव चावडा (वय ६५) हे दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दुचाकी क्र. एम.एच.१५.ए.टी. ८४५८ मध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना हॉटेल सायलीनजीक समोरून येणाऱ्या मालवाहू चारचाकी (एम.एच.१९.एस.९४८१) ने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील काही नागरिकांनी अपघातात जखमी असलेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजते.