जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील शेकडो जळगावकर पहाटे व संध्यकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर मोर्निग वॉक करण्यासाठी बाहेर पडत असतात, आता जळगाव ते कानळदा मुख्य रस्ता देखील सुसज्ज झाल्याने अनेक नागरीक या रस्त्यावर देखील वॉक करण्यासाठी येत असतात, याठिकाणी मात्र मोर्निग वॉक करणे एकाच्या जीवावर बेतले आहे, याठिकाणी सुदेवाने कुणाच्याही जीवाची हानी झालेली नाही. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात एका चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जुना कानळदा रोडवर दि.४ जानेवारी रोजी सकाळी ५.२५ वाजेच्या सुमारास शहरातील गेंदालाल मिल परिसरातील सुधीर उत्तम सोनवणे(वय ४५) हे आपले मित्र अरुण निकम यांच्यासह मोर्निग वॉक करण्यासाठी गेले असता. ते पायी जात असतांना कानळदा गावाकडून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीने या दोन्ही मित्रांना ठोस दिली व याठिकाणी चारचाकी चालक न थांबता घटनास्थळावरून फरार झाला यात सुधीर सोनवणे यांच्या पायास, डोक्यास व चेहऱ्याला देखील दुखापत झाली आहे. यांनी लागलीच जळगाव शहर पोलिसात धाव घेत पांढऱ्या चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास स.फौ.संजय झाल्टे हे करीत आहेत.