जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२४
आंतरराष्ट्रीय महाशिवपुराण कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचे मालेगाव रोड चाळीसगाव येथे सुमारे चाळीस एकरात आयोजन करण्यात आले असून खा. उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमस्थळी प्रभू श्रीराम व मंदिराचे दोन लाख दिव्यांमधून मोजेक पेंटींगची प्रतिकृती साकारली जाणार असून ही चित्रकृती जागतिक रेकॉर्ड करणार असल्याची माहिती खा. उन्मेश पाटील यांनी याप्रसंगी दिली आहे.
मोजेक पेंटिंग जगातील एक आगळीवेगळी कलाकृती आहे. सुमारे दोन लाख दिव्यांमधून प्रभू श्रीराम व अयोध्या मंदिराची प्रतिकृती साकारली जाणार आहे. २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने चाळीसगावकर व परिसरातील भाविक भक्तांना या प्रभु श्रीराम व मंदिर प्रतिकृतीचे दर्शन व्हावे.
या उद्देशाने दोन लाख दिव्यांच्या माध्यमातून ही राम मंदिर व श्रीराम प्रभू श्रीरामाची कलाकृती सादर केली जाणार आहे आज पर्यंत देशात एक लाख ८० हजार दिव्यातून प्रतिकृती साकारल्याचे वर्ल्ड रेकॉर्ड होते. चाळीसगांव येथील कलाकृतीतून दोन लाख दिव्यांचे १०० फूट लांब बाय ८० फूट रुंदीची कलाकृती नवीन चित्रकृती सादर करण्यात येणार असून ही कलाकृती जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहे. वर्ल्ड रेकॉर्ड व्यवस्थापन समिती येणार असून मुंबईचे कलाकार चेतन राऊत व त्यांचे दहा कलाकार व ४० महिला भगिनी या दिव्यांच्या रंगकाम, मांडणीसाठी मदत करणार आहे.
कार्यक्रमस्थळ पाहणी प्रसंगी खा.उन्मेश पाटील, उमंग सृष्टी परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील यांच्या शुभहस्ते या पवित्र दिवे पेंटींग कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक प्रकाश पवार, उद्योजक पद्माकर पाटील, नरेनकाका जैन, कलाकार चेतन राऊत, वास्तूविशारद आशुतोष खैरनार स्वयंसेवक, कार्यकर्ते, पदा धिकारी, उपस्थित होते.