जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४
जामनेर शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव आयोजित ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनचे आयोजन ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय येथे दि.१२ ते १३ जाने.२०२४ दरम्यान नुकताच संपन्न झाला.
शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी जामनेर शहराच्या नगराध्यक्ष सौ.साधनाताई महाजन यांच्या शुभहस्ते परीक्षक प्रमाणपत्र, बुके जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्टरित्या परीक्षक म्हणून काम पाहिल्याबद्दल इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सुमित संजय काबरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.