जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२४
राज्यातील ठाकरे गट निवडणुकीपूर्वी आता दौऱ्यावर भर देत असतांना नुकतेच दि.२२ रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिवारासह दर्शन घेत आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
“न्यायाविरूद्ध लढण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रात ठिणगी पेटवली त्या बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. त्यांना मी अभिवादन करतो. अनेकांनी रामाचे मुखवटे घातले आहेत. पण तुम्ही माझी तुलना रामाशी केली नाही त्यासाठी धन्यवाद. जो महाराष्ट्रावर चालून आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. राम एका पक्षाची मालमत्ता नाही. नाहीतर आम्हाला भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“काल तिकडे सगळे अंधभक्त एकत्र झाले होते. कोणी तरी म्हटलं की मोदी शिवाजी महाराज आहेत. अजिबात नाही. कोणीही नाही, शिवाजी महाराज यांच्यामुळे काल तुम्ही अयोध्येत गेला. आम्ही शिवनेरीची माती घेऊन अयोध्येत गेलो आणि वर्षभरात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. “राम की बात हो गयी अब काम की बात करो. 75 वर्षात काँग्रेसने काय केलं विचारता, तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा? हिंमत असेल तर मैदानात या, शिवसैनिक हे माझी वडिलोपार्जित आहे. चोरून मिळवले नाहीत. भाजपमुळे दिल्ली दिसली नाही. माझ्या शिवसैनिकांमुळे दिल्ली दिसली..” असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
कोविड काळातील घोटाळे काढता. पीएम केअर फंडाचा घोटाळा काढा? पंतप्रधान केअर फंड खासगी फंड आहे असं सांगतात. पंतप्रधानपद गेल्यानंतर तुम्ही काय घेऊन जाणार आहात? घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडपासून सुरू झाली. ऍम्ब्युलन्स मध्ये 8 हजार कोटींचा घोटाळा केला. आम्हाला बोलतात काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसवाले झाले. तीस वर्षे सोबत राहून भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय होऊ, असेही ठाकरे म्हणाले.