जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२४
अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठेला उपस्थित असलेले जैन इरिगेशन उद्योजक अशोकभाऊ जैन अयोध्या येथून जळगांवला परतले असता त्यांचे रेल्वे स्थानकावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आ.एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दिनांक २२ रोजी मंगळवार रोजी प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा करुन परत आले असता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे स्वागत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने जळगांव रेल्वे स्टेशनवर आगमन झाले असता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे आ.एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी अशोक लाडवंजारी, राजु मोरे, उमेश पाटील, युवक महानगर अध्यक्ष रिंकू चौधरी,अशोक सोनवणे, महानगर अघ्यक्ष रमेश बारे, अल्पसंख्यक महानगर जिल्हाअघ्यक्ष डॉ रिजवान खाटीक , उपाध्यक्ष डॉ संग्रामसिग सुर्यवशी, डॉ अभिषेक ठाकूर, ओबीसी सेल महानगर जिल्हाअघ्यक्ष नामदेव वाघ, युवक उपंअघ्यक्ष चेतन पवार , सरचिटणीस हितेश जावळे , सरचिटणीस सुहास चौधरी , इगळे भाऊसाहेब ,अजय बंढे , पंकज तनपुरे , योगेश लाडवंजारी , भाऊसाहेब सोनवणे संर्व पदाधिकारी कार्यकर्त विविध आघाडी सेल पदाधिकारी कार्यकर्त यानी उपस्थित होते.