जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२४
अयोध्या येथे दि. २२ जानेवारी रोजी प्रभू रामललाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा उत्साहात सुरु असतांना जळगाव शहरात देखील या सोहळ्याच्या दिवशी मोठा उत्साह करण्यात आला.
शहरातील अयोध्यानगर मधील लिलापार्क परिसरात भाविकांनी गल्ली मध्ये पेंटकरुन रांगोळी काढल्या पुरष वर्गानी पुर्ण गलीत लाईटींग लावली. भगवे ध्वज लावले.या वेळी लिलापार्क मनुमाता सेवा मंडळाच्या महीला सौ.मंगला खडसे, सिमा वाणी, हेमा भांरबे, शुभांगी बार्हाटे, छाया पाटील, निशा खडके, स्नेहा पाटील, प्रतीक्षा जाधव, तर लिलापार्क मिञ मंडळाचे विलास वाणी,किसन मराठे,शैलेद्र खडसे,प्रशांत जाधव,राजु बांरबे,रितेश पाटील उपस्थीत होते.