जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२४
पिंप्राळा परिसरातील सोनी नगर येथे जागृत स्वयंभू महादेव मंदिरात दि. 26 पासून श्री शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला आहे. कथेचे निरूपण ह. भ. प. देवदत्त महाराज मोरदे हे करत असून श्री शिव महापुराणातील विविध कथांचे निरूपण करत असताना शिवपंचाक्षरी मंत्र तसेच मौनव्रताचे महत्व श्री शिव महापुराण कथेत सांगण्यात आले.
शिव ही अनादी देवता असून विश्वाची उत्पत्ती ब्रह्मदेवांनी केली विश्वाचे संगोपन विष्णू परमात्म्याने केले आणि विश्वाचे संतुलन भगवान शिव करतात. शिवभक्ती करत असताना तीर्थयात्रेचे खूप महत्त्व आहे तीर्थ हे मनुष्याला सदाचारी जीवन देतात
सत्य दया दान आणि तप ही धर्माची लक्षण आहेत.अन्नदानाचे महत्त्व सांगत असताना जेवण घेत असताना आग्रह करू नये त्यामुळे अन्नाची नासाडी होते अन्न वाया जाते.अन्नाचा कण आणि संतांचा क्षण जीवनात महत्त्वाचा आहे. रोज भोजन करत असताना शेतकऱ्यांचे कष्ट डोळ्यासमोर आणावे म्हणजे अन्नाची नासाडी होणार नाही.असे देवदत्त महाराजांनी कथेतून आवाहन केले.
कथेसाठी शंभू सुतार,कैलास परदेशी,प्रकाश आहिरे,राजेंद्र देशपांडे, संजय इच्छापुरकर,मनोज पाटील हे संगीत साथ करीत असून नांदेड तालुका धरणगाव येथील श्री मिलिंद पाठक गुरुजींच्या मंत्रघोषाने अनुष्ठान स्थापना करण्यात आलेली आहे त्यामुळे कथेला रंगात निर्माण झाली आहे.
सोमवारी महाआरती आमदार सुरेश भोळे,महापौर जयश्री सुनिल महाजन, आबा कापसे, सामाजिक कार्यकर्ता अतुल बारी,सुरेश सोनवणे, प्रकाश बालाणी,निंबा महाले, समाधान ठाकरे,हेमराज गोयर,भैय्यासाहेब बोरसे, संजय भोई,हर्षल सातपुते, दामोधर आडेकर, ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली.
*आज दि.30 रोजी श्री शिवमहापूराण कथेत श्री शिव पार्वती विवाह सोहळ्या निमित्त सजीव आरास करण्यात येणार असून सोनी नगर परिसरातील जवळपास 30 कार्यकर्ते यात सहभागी होतील,सर्व देवी देवता तसेच शिव लग्नाच्या वरातीतील भुतांचा नृत्याचा देखावा यात दाखावण्यात येईल, काथेसाठी समस्त भाविक भक्तांच्या उपस्थितीने शिवमहापूराण कथेस आनंदाची लहर निर्माण झाली आहे आज शिव पार्वती विवाह सोहळ्याची कथा व सजीव आरास संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे नरेश बागडे यांनी आवाहन केले आहे.
कथेचे यजमान निलेश जोशी नंदिता जोशी असून देविदास पाटील, मधुकर ठाकरे, सरदार राजपूत, विनोद निकम,येशवंत पाटील, हेमराज गोयर, भैय्यासाहेब बोरसे, संजय भोई, विजय चव्हाण, कैलास कोळी, विजय चव्हाण, अजय बागडे, सूर्यकांत पारखे, उमेश येवले, उदय महाले, ओंकार जोशी, वेदांत बागडे, कैलास साळवे,सोनीनगरातील महिला मंडळ परीश्रम घेत आहे.