जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२४
गुजरात राज्यातील सुरत येथील ड्रग्स तस्कराचा मागावर असलेले अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) भुसावळ रस्त्यावर घोडे पीरबाबाच्या दरगाहजवळून रविवारी सायंकाळी मोबीन शाह याला सिनेस्टाईलने ताब्यात घेतले. पळून जाण्यापुर्वीच त्या संशयितावर पिस्तुल रोखून धरत त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला गुजरात येथे घेवून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील सूरत येथील संशयित मोबीन हा आपल्या काही साथीदारांसोबत (जी. जे.०५ आर एम.८४८०) क्रमांकाच्या कारने यावल तालुक्यात आला होता. दरम्यान, गुजरातधील अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) पथक गेल्या अनेक दिवसांपासून त्या संशयिताच्या मागावर होते. मोबीन शाह हा यावल भुसावळ रस्त्यावर घोडेपीर बाबा दर्गाजवळ असल्याची कुणकुण पथकाला लागताच रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता पथकाने त्याला शिताफीने अटक केली. पथकाला पाहून मोबीन शाह याने पलायनचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्यावर पिस्तूल रोखून त्यास सिनेस्टाइल पद्धतीने ताब्यात घेतले. मोबीन शहा याच्याकडून पथकाने एक पिस्तूल व इतर काही वस्तू हस्तगत केल्या.
एनसीबीच्या पथकाने मोबीन शाह याला ताब्यात घेताच त्याच्यासोबत असलेले अन्य तीन साथीदारांनी तेथून पळ काढला. कारवाईनंतर मोबीन शहा याला घेऊन पथक गुजरातकडे रवाना झाले. मात्र त्या संशयिताची कार घटनास्थळी पडून आहे.