अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखित स्नेहवर्धन प्रकाशन पुणे प्रकाशित मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार (1878 ते 1947 स्वातंत्र्यपूर्व काळ) या ग्रंथाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे शुभ हस्ते साहित्य संमेलनातील प्रकाशन कट्टा येथे संपन्न झाले.
याप्रसंगी म.सा.प.पुणे कार्यवाह विं.दा .पिंगळेसर, श्री.राजेश पांडे, सौ.शोभणे, गोकुळ बागुल, विजय पवार व लेखक प्रा. प्रभाकर जोशी यांची उपस्थिती होती. शोभणे यांनी या पुस्तकातील आशयासंदर्भात व उपयुक्तते संदर्भात विचार मांडलेत. पुस्तक प्रकाशन वेळी रसिकांची मोठी उपस्थिती होती. डॉ. पिंगळे यांनी सूत्रसंचलन केले तर विजय पवार यांनी आभार मानले.