जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२४
शहरातील समता नगरात राहणाऱ्या दीपक भगवान महाजन (वय २१) या तरुणाला हरीविठ्ठल नगरजवळ रेल्वेरूळ ओलांडतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने उपचारापुर्वीच दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरीविठ्ठल नगरातील रेल्वे रूळ ओलांडत सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दिपक महाजन हा असतांना त्याला धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. रेल्वे अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस कर्मचारी अनिल नगराळे आणि देवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.