भातखंडे : प्रतिनिधी
भातखंडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी अशोक बाबूलाल पाटील तर व्हा. चेअरमन पदी रवींद्र दामू पाटील यांची निवड करण्यात आली. निवडी प्रसंगी संस्थेचे संचालक माधवराव लक्ष्मण पाटील, सुभाष नामदेव पाटील, एकनाथ तोतराम पाटील, कैलास गुलाबराव पाटील, गुलाब झिपरू पाटील, हिम्मत पुंडलिक पाटील, रामकृष्ण भगवान पाटील, रत्नबाई रविंद्र पाटील, सुरेखाबाई मधुकर पाटील, प्रकाश राघो सोनवणे, सर्व संचालक ग्रामपंचायत सदस्य, नितीन सुभाष पाटील, राहुल अशोक पाटील उपस्थित होते.
यावेळी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शेतकी संघाचे माजी अध्यक्ष पंडितराव नामदेव पाटील यांनी सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले. प्रसंगी संस्थेचे सचिव बापुराव देसले संस्थेचे कर्मचारी विनायक पाटील व गावातील अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.