मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आज संकटाचा दिवस आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तर काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ – वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा चांगला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन – मिथुन राशींच्या लोकांसाठी आज भाग्याचा दिवस आहे. कर्मचारी वर्गांना ऑफिसमध्ये गोड बातमी मिळेल. ज्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातारवण राहील.
कर्क – कर्क राशींच्या लोकांना आज नशीबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
सिंह – सिंह राशीच्या लोकांना आज गोड बातमी मिळेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काही जण सामाजिक क्षेत्रात सहभागी होतील.
कन्या – कन्या राशीच्या लोकांच्या आज मनातील इच्छा पूर्ण होतील. काहींना नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अनेकजण जिद्दीने काम करतील.
तूळ – तूळ राशीच्या लोकांच्या नशीबाला आट कलाटणी मिळेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल, हाती पैसा येईल.
वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांना आज घवघवीत यश मिळेल. काहीजण आपल्या मतांविषयी आग्रही राहतल. ज्यामुळे दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनू – धनू राशीच्या लोकांनी आज सावध राहावे. तसेच कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर – मकर राशीच्या लोकांच्या आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबातील व्यक्तींचा तसेच मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. पत्रव्यवहार पार पडतील.
कुंभ – कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. ऑफिसच्या कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मीन – मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच खास असेल. अनेकांना गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती पैस येईल.